अभिनंदनीय.! -अस्मी मांजरेकरची जेतेपदाची हॅटट्रिक.! ; वक्तृत्व स्पर्धेचे अव्वल क्रमांकासह पुन्हा मारले मैदान.!

40

सावंतवाडी : मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

‘मोबाईलमुळे हरवतेय बालपण’ या विषयावर तिने आपले वक्तृत्व कथन केले होते. गेल्या दहा दिवसातील हे तिसरे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असून सलग तीन पारितोषिके पटकावून जेतेपदाची हॅटट्रिक केली आहे. विशेष म्हणजे तिन्ही स्पर्धेत वेगवेगळे विषय होते.

अस्मी हिला तिची आई, महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार विजेत्या शिक्षिका प्रा. सौ. सुषमा मांजरेकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल अस्मी हिचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक पी. एम. सावंत, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षिका श्रीम. बी. आर. चौकेकर, वर्गशिक्षिका शुभांगी देसाई व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.