‘पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी.!’ – कहत छोटा ‘कबीरा’. ; सावंतवाडीतील ‘हेरेकर’ पिता – पुत्र करताहेत पर्यावरण संवर्धंनाचा प्रचार-प्रसार.

175

सावंतवाडी :  येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता दुसरीत शिकणारा कु. कबीर हेरेकर हा नेहमीच समाजाला पर्यावरण रक्षण व निसर्ग संवर्धनाचे धडे गिरवत असतो.
दिनांक 15 डिसेंबर रोजी कबीर याने सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे घरामध्ये उपयोग होणारे प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या न टाकता त्यांचे वापर आपण इको ब्रिक्स बनवता येते व ह्या ब्रिक्सचे वापर आपण कश्या प्रकारे करु शकतो याचे प्रातेक्षिक सादर केले. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे कबीरचे म्हणणे आहे प्रत्येकाने खारिचा वाटा उचलला पाहिजे असे विचार मनात बाळगत कबीर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून समाजाला संदेश देत असतो.
याच बरोबर कबीरचे वडील व सावंतवाडी येथील प्रसिद्ध सर्पमित्र व प्राणिमित्र नवीद हेरेकर यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी सापांची भूमीका व सापांबद्दल असलेली भीती व अंधश्रद्धा यावर अधिक माहिती सादर केली. सर्प हे आपल्या निसर्गाचे एक मुख्य भाग असून ते शेतकर्यांचे खरे मित्र आहे, असे विचार मांडले.
पर्यावरण रक्षण व निसर्ग संवर्धन करण्यासाठी ही पिता – पुत्रची जोडी सदैव प्रयत्नशील असते.