सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत काम संपावर गेले आहेत. आजपासून काम बंद आंदोलन छेडत जुन्या पेन्शनच्या कर्मचारी यांच्या जिव्हाळयाचे मागणीसह इतर, रिक्त पदे भरती, आठव्या वेतन आयोगाचे तात्काळ गठन करणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ करा व इतर १८ मागण्यासाठी जिल्हयातील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आले आता माघार नाही जुनीपेशन मिळाली च पाहीजे तोपर्यत संप मागे घेणार नाही, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती सरचिटणीस सत्यवान मालवे यांनी दिला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन लागू करा यासह नाही बघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांबाबत भाषणे केली त्यात सत्यवान मालवे प्रवीण पाताडेया सर्व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाने जुनी पेन्शन लागू केली पाहिजे अनेक रिक्त पदे भरा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्र राज्य संघटनेने घेतला असून त्याच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा संघटना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी यांनी बाईक रॅली, तद् नंतर सहकुटुंब माझे कुटुंब माझी पेन्शन असा मोर्चा काढला. होता सदरच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणुन १४ डिसेंबर २३ पासुन नाईलाजास्तव आपल्या संतप्त भावना व्यक्त करणेसाठी बेमुदत संपावर जावे लागले आहे
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व महसुल, तलाठी, ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी, आयटीआय , सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा , वस्तु सेवा कर या सह सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दरम्यान जुनी पेन्शन लागू करा या सर्व विविध मागण्याबाबत घोषणानी परिसर दणाणून सोडला
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष व समन्वय समिती सरचिटणीस श्री.सत्यवान माळवे यांनी १४ डिसेंबर पासुन होणारे बेमुदत संपामध्ये सर्व कर्मचारी हजारो सहभागी झाले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील अधिकारी महासंघ देखील यामध्ये सहभागी होत असुन दि. १४ डिसेंबर २३ रोजी सामुदायिक रजा आंदोलन करणेत येत आहे. सदर आंदोलनामध्ये मोल्याप्रमाणात कमलारी सहभागी झाले एनपीएस(NPS) कर्मचाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आणि आपल्या पुढील भवितव्याचा विचार करून सदर आंदोलनाच शासनाने दखल घ्यावी नपेक्षा आपली ताकद दाखवू.
जुनी पेन्शन धारक आणि पेन्शनर्स आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शासनाने याबाबत दखल न घेतल्यास आम्हाला यापुढे मतदानावरही बहिष्कार घालावा लागेल यापूर्वी
‘मोर्चा न भूतो न भविष्यती’ असा काढला. या पुढे ही सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक सर्वांनी सहकुटुंब कोणताही संकोच न करता सदर संप आंदोलनात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
एकच मिशन, जुनी पेन्शन.!
माझे भविष्य माझी लढाई..!!!
असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग
सरचिटणीस श्री.सत्यवान माळवे यांनी केलेले आहे.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस राजन वालावलकर, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, सचिन माने, श्री.शाम लाखे, कोषाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटना व प्रमुख मागर्दशक प्रवीण पाताडे, संजय पवार यांचेसह विवीध प्रवर्ग निहाय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





