खून प्रकरणाचा जलद गतीने तपास केल्याबद्दल PI ऋषिकेश अधिकारी व सहकर्‍यांचा झाला सन्मान.! ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सजग सावंतवाडीकरांनी केला सत्कार.

64

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आठवड्याभऱ्यापूर्वी घडलेल्या एका महिलेच्या खून प्रकरणात आरोपीला अतिशय जलद गतीने तपास करून सावंतवाडी पोलिसांनी गजाआड केले. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या या कर्तबगारीमुळे आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या कार्यतत्परतेमुळे जनमानसांच्या मनात पोलिसांविषयीच्या भावना आणि आदर उंचावला आहे. या गोष्टीची दखल घेत आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सावंतवाडीतील माजी नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व त्यांच्या टीमचा सत्कार केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार तथा मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, बंटी माठेकर , रवी जाधव, सुधीर पराडकर, अभय पंडित, प्रदीप ढोरे, आसिफ बिजली, मनोज घाटकर, तौकीर शेख, संदीप नाईक आदी उपस्थित होते.