कॅनबेरा : डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर आलेल्या 15 षटकात 152 धावा करण्याचे आव्हान आले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 13.3 षटकातच पार केलं. रिझा हेड्रिक्सने 49 धावांची दमदार खेळी केली. त्याला कर्णधार माक्ररमने 30 धावांचे योगदान देत चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताचे 152 धावांचे आव्हान 13.3 षटकातच पार करत मालिकेतील दुसरा सामना जिंकला. याचबरोबर त्यांनी मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर रिझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर कर्णधार एडिन माक्ररमने 30 धावांचे योगदान दिले.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकात 152 धावांचे आव्हान आले. भारताकडून रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 धावांचे योगदान दिले होते.




