4 फेब्रुवारीला ‘ हितगुज मुलांशी, संवाद पालकांशी ‘ कार्यक्रमाचे आयोजन : अर्चना घारे व राकेश नेवगी

सावंतवाडी : अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना घारे व राकेश नेवगी यांची पत्रकार परिषद, 4 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत ‘ हितगुज मुलांशी, संवाद पालकांशी ‘ हा मुलांच्या उज्वल भविष्यासाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अर्चना घारे व राकेश नेवगी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मुलांमध्ये होणारे वैचारिक बदल, पालक व मुलांमध्ये शब्द व वेळ वापरून नात्याचा एक सेतू निर्माण करणे, मुलांना आत्मविश्वास व अतिविश्वास यामधील फरक पटवून देणे, सोशल मीडिया व आपले आयुष्य यामधील फरक, मोबाईलचे शारीरिक, मानसिक व स्वाभाविक दुष्परिणाम अशा विविध विषयावर मोफत मार्गदर्शन व पालकांशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुक्त संवाद साधण्यात येणार आहे.

हा संवाद कळसुरकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. तरी पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी व त्याच्या पालकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन अर्चना घारे व राकेश नेवगी यांनी केले आहे. यावेळी नवीद हेरेकर, दर्शना बाबर देसाई, अँड.सायली दुभाषी, नरेश जीवने, सिद्धेश किनळेकर आधी उपस्थित होते.