मुंबई : ‘मास्टरशेफ इंडिया ८’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा नुकताच ग्रँड फिनाले फार पडला आहे. विकास खन्ना, रणवीर बरार आणि पुजा ढिंगरा यांनी या पर्वाचं परिक्षण केलं आहे. 16 ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम सुरू झाला होता. या पर्वात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुकिंग शैलीने जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 24 वर्षीय मोहम्मद आशिकने ‘मास्टरशेफ इंडिया 8’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मोहम्मद हा कर्नाटकातील मैंगलोर परिसरात राहणारा आहे.
मोहम्मदला किती रुपये मिळाले?
मोहम्मद आशिकला ‘मास्टरशेफ इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. पण यापर्वात सहभागी होत विजेतेपदावर त्याने नाव कोरलं आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मोहम्मदला मोठा संघर्ष करावा लागला आहे. कर्नाटकातील मैंलोरमध्ये मोहम्मदचं एक ज्युस सेंटर आहे. ‘मास्टरशेफ इंडिया 8’चा विजेता ठरलेल्या मोहम्मदला 25 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे. मोहम्मदसह टॉप चार स्पर्धकांमध्ये नाम्बी मारक, डॉ. रुखसार सईद आणि सूरज थापा यांचाही समावेश होता.





