अर्थसंकल्प 2023 विशेष 3, नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान आवास योजनेचा खर्च ६६ टक्क्यांनी वाढवण्याची मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या घोषणेनंतर पीएम आवास योजनेवरील खर्च ७९,००० कोटी रुपयांपर्यंत वाढेल. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी (PMAY) ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.
देशातील गरजूंना त्यांच्या हक्काचे घर देणे प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घरे नाहीत त्यांना घर बांधण्यासाठी सरकार पैसे उपलब्ध करून देते. ज्यांच्याकडे कायमस्वरूपी घर नाही अशा लोकांना घरे दिली जातात. गृहनिर्माण योजनेंतर्गत यादी तयार करताना लाभार्थ्यांकडे दुचाकी किंवा तीनचाकी वाहन नाही याची खात्री केली जाते. यासोबतच इतरही अनेक मानके निश्चित करण्यात आली आहेत.





