सावंतवाडीत होणार जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा.! ; स्नेह नागरी पतसंस्था, रोटरी क्लब सावंतवाडी, मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावत्तवाडी यांचे आयोजन.

72

सावंतवाडी : स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी, रोटरी क्लब सावंतवाडी, व मॉर्निंग बॅडमिंटन क्लब सावत्तवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५, १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. खालीलप्रमाणे विविध गटातून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

१) शालेय गट सिंगल : १२ वर्षाखालील मुले व मुली, प्रवेश फी रू. ५०,
सिंगल : १७ वर्षाखालील मुले व मुली, प्रवेश फी रू. १००
२) खुलागट सिंगल : पुरुष – प्रवेश फी रू. २००,
महिला -प्रवेश फी रू. २००
३) खुलागट दुहेरी : पुरुष – प्रवेश फी रु. ३००, महिला प्रवेश फी रू. ३००
४) प्रौढ पुरुष गट : फक्त दुहेरी ( वयोमर्यादा ५५ वर्ष वरील) प्रवेश फी रू. ३००
जिल्हास्तरीय शालेय गटातील (मुले व मुली) खेळाडूंच्या बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवार दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये होतील. इतर सर्व गटातील स्पर्धा दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी जिमखाना सावंतवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये घेण्यात येतील.
सहभागी खेळाडूंची नाव नोंदणी स्नेह नागरी पतसंस्था सावंतवाडी या संस्थेच्या सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या शाखाकर्यालयाकडे करावयाची आहे. खेळाडूनी नाव नोंदणी दि. १३.१२.२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजेपर्यंत वर नमुद ठीकाणी करावयाची आहे. दि. १४.१२.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता सामन्यांकरीताचे लॉटस् काढण्यात येतील. प्रवेश फी भरल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी श्री. वेतन आजगावकर, सावतवाडी, भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०५४८५१ यांना संपर्क करावा.
तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धामध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मा. अध्यक्ष रोटरी क्लब, सावंतवाडी, मा. अध्यक्ष स्नेह नागरी सहकारी पतसंस्था व मा. अध्यक्ष मॅर्निंग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांनी केले आहे.

नांव नोंदणीकरीता संपर्क:
स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी
शाखा सावंतवाडी : वसंत प्लाझा, गांधी चौक
फोन : ०२३६३ २७५११०, ७३९९८३९०५३

शाखा कुडाळ : स्टेट बॅन्कनजीक, पानबाजार कुडाळ फोन : ०२३६२ २२४११०, ८९७५९७६४००

शाखा कणकवली : वरवडेकर कॉम्प्लेक्स, पहिलामजला, बाजारपेठ, कणकवली फोन : ८९७५२५२९७९