सावंतवाडी : सौ.अर्चना घारे यांनी आयोजित केलेला ‘सफर पुस्तकांच्या दुनियेत’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत असलेल्या वाचन संस्कृतीला पुनरुज्जीवीत करण्याचा त्यांचाप्रामाणिक प्रयत्न आहे.!, अशा शब्दांत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सौ. अर्चना घारे यांनी प्रा. बांदेकर यांचे स्वागत करत त्यांना पुस्तक प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम, प्राचार्य व कवी सिद्धार्थ तांबे, सेवानिवृत्त उपक्रमशील शिक्षक संतोष वैज, अॅड. सायली दुभाषी, पूजा दळवी आदि उपस्थित होते.
“लहानपणी शाळेत मला इंग्रजीचे धडे शिकवणाऱ्या बांदेकर सरांकडून मी आजही जीवनाचे अनेक बहुमोल पाठ शिकत असते. या पुस्तक प्रदर्शनास बांदेकर सरांच्या शुभेच्छा व आशीर्वाद लाभले, हे मी माझे भाग्य समजते. आदरणीय बांदेकर सरांचे मनापासून आभार व यापुढेही त्यांचे मार्गदर्शन मला लाभावे ही सदिच्छा.!”, अशा भावना यावेळी सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या.





