सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ५१ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कलंबिस्त हायस्कूलमध्ये नियोजनबद्धरित्या आयोजित केल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी गौरवोद्गार काढले. कलंबिस्त सारख्या ग्रामीण भागात हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करुन येथील विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अशी प्रदर्शने अत्यावश्यक असून यातून नवीन संशोधक घडतील असा विश्वास व्यक्त करीत या विज्ञान प्रदर्शनाचे त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजन ,पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत, खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र रेडकर, एकनाथ सोनुर्लेकर, विभाग प्रमुख जीवन लाड, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, संजीव पालकर, विनायक सावंत, संदेश सोनुर्लेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र घावरे, संस्थेचे सचीव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, संचालक चंद्रकांत राऊळ, शंकर राऊळ, लाडजी राऊळ, वसंत सावंत, शशिकांत धोंड, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, सांगेली केंद्रप्रमुख गुंडू सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, पंचायत समिती माजी सदस्य रमेश सावंत, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, तालुका अध्यक्ष ऋषिकेश गावडे, शिक्षण तज्ज्ञ काका मांजरेकर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे म. ल. देसाई, संजय शेडगे, माजी मुख्याध्यापक सीताराम सुर्वे, वेर्ले सरपंच सुप्रिया राऊळ, सावरवाड सरपंच श्रीम. पवार, नंदू गावडे, स्नेहा कुडतरकर, माजी सरपंच कृष्णा सावंत, प्रल्हाद तावडे, सूर्यकांत राजगे, राजेश पास्ते, सुनील सावंत, आंतोन लॉड्रीक्स आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने राजन पोकळे यांनी दीपप्रज्वलन केले. कलंबिस्तसारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात दर्जेदार असे विज्ञान प्रदर्शन होत आहे, याचा नक्कीच येथील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे लाभ होईल. विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा देत चोख व्यवस्था व सूत्रबद्ध नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या उद्घाटन सोहळ्याचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी केले.

२ व ३ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. मांडण्यात आलेल्या प्रतिकृती या खूपच उद्बोधक नाविन्यपूर्ण व सर्जनशील होत्या. यावेळी पालक, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, अनेक संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी या प्रदर्शनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याठिकाणी चांद्रयान प्रतिकृती व सेल्फी पॉईंट्स अनेकांचे आकर्षण ठरत होते. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी या प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्व पालक- ग्रामस्थ, माजी विद्यार्थी या सर्वांनी मेहनत घेतली. प्रदर्शनाच्या निमित्ताने प्राथमिक गट व माध्यमिक या दोन गटांत प्रश्नमंजुषा,निबंध व वक्तृत्व स्पर्धांचेही यशस्वी आयोजन करण्यात आले.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-
कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त ता.सावंतवाडी या ठिकाणी सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रतिकृती निर्मिती व विविध स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-
विद्यार्थी विज्ञान प्रतिकृती- प्राथमिक गट( इ. सहावी ते आठवी ) –
१.प्रथम क्रमांक- अद्विता संजय दळवी ( यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, चराठे)
२. द्वितीय क्रमांक योगेश विवेकानंद जोशी (आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी)
३. तृतीय क्रमांक-वैदेही विनायक बिर्जे (अटल बिहारी वाजपेयी शाळा चराठे नं.१)
विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गट (इ. नववी ते बारावी) –
१. प्रथम क्रमांक-नाझमीन संजय तडवी (सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
२. द्वितीय क्रमांक- अदिती अवधूत राज्याध्यक्ष (विद्याविहार इंग्लिश स्कूल,आजगाव)
३.तृतीय क्रमांक(विभागून) सारिका धुरी (कोलगाव हायस्कूल) व वैष्णवी सुधाकर दळवी (आंबोली विद्यानिकेतन)
शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती (प्राथमिक गट) –
१.प्रथम क्रमांक- श्री संजय कृष्णा बांबुळकर( जि प.पू. प्रा. शाळा मळेवाड नं.१)
२. श्री. प्रसाद माधव डेगवेकर(जि.प.शाळा कुणकेरी नं.१)
३. श्री. प्रदीप कुमार बाळकृष्ण म्हाडगूत (जि.प.शाळा,आंबेगाव नं.१)
शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती ( माध्यमिक गट) –
१.प्रथम क्रमांक- श्रीम. शितल एस मोरजकर(सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
२.द्वितीय क्रमांक- श्रीम. एस्. यु.बांदेलकर(कळसूलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी)
३. तृतीय क्रमांक- श्री.नितीन लक्ष्मीकांत धामापुरकर माध्यमिक विद्यालय ,नेमळे.
प्रयोगशाळा सहाय्यक परिचर शैक्षणिक साहित्य निर्मिती –
१. प्रथम क्रमांक- सूर्यकांत गजानन चव्हाण (खेमराज मेमोरियल बांदा)
२. द्वितीय क्रमांक- वर्षा राजेश केसरकर(कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी)
३. तृतीय क्रमांक विभागून- सिताराम तुकाराम कोळेकर (जनता विद्यालय तळवडे) व रवींद्र गणपत राऊळ(माध्यमिक विद्यालय सांगेली)
निबंध स्पर्धा प्राथमिक गट (इयत्ता सहावी ते आठवी)
१. प्रथम क्रमांक- अनुष्का अनिल तेली
(माध्यमिक विद्यालय माडखोल)
२. द्वितीय क्रमांक- गौरंगी गणेश राणे ( नूतन माध्यमिक विद्यालय,इन्सुली)
३. तृतीय क्रमांक-अक्षरा अनिल राऊळ (जि .प. शाळा शिरशिंगे नं.१)
निबंध स्पर्धा-माध्यमिक गट(इयत्ता नववी ते बारावी)
१. प्रथम क्रमांक- प्रियंका आनंद भागवत ( जनता विद्यालय,तळवडे)
२. द्वितीय क्रमांक- आर्या अनिल राणे ( नूतन विद्यालय, इन्सुली)
३. तृतीय क्रमांक-हर्षिता एकनाथ गावडे (मळगाव इंग्लिश स्कूल)
वक्तृत्व स्पर्धा- प्राथमिक गट (सहावी ते आठवी)
१.प्रथम क्रमांक- अस्मी प्रवीण मांजरेकर ( आरपीडी हायस्कूल सावंतवाडी)
२. द्वितीय क्रमांक- विभागून-अद्विता संजय दळवी(यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल चराठे) व भार्गवी अंकुश शेटवे( मिलाग्रिस हायस्कूल)
३. तृतीय क्रमांक- रुची चंद्रशेखर कवठणकर(नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)
वक्तृत्व स्पर्धा-माध्यमिक गट (इ.नववी ते बारावी)
१. प्रथम क्रमांक-वैभवी उदय बांदेलकर (कळसूलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी)
२.द्वितीय क्रमांक-रेश्मा संदेश पालव नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)
३. तृतीय क्रमांक-प्रियंका आनंद भागवत ( जनता विद्यालय तळवडे)
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक गट इयत्ता सहावी ते आठवी
१.प्रथम क्रमांक- मिलाग्रिस हायस्कूल (कृष्णा महेश पास्ते व विराज नंदकिशोर राऊळ)
२. द्वितीय क्रमांक- यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल(माही ललितकुमार विठलानी व वेदांग मुकुंद अंबापूरकर)
३. तृतीय क्रमांक – मळगाव इंग्लिश स्कूल (समृद्धी चंद्रकांत रावळ व मानसी प्रवीण डोंगरे)
प्रश्नमंजुषा स्पर्धा माध्यमिक गट -इ. नववी ते बारावी)
१. प्रथम क्रमांक -कलंबिस्त इंग्लिश स्कूल (संकेत कृष्णा जाधव व विठ्ठल मनोज बिडये)
२. द्वितीय क्रमांक- मिलाग्रिस हायस्कूल (रुद्रांगी रवींद्र सावंत व मानसी सुदेश राणे)
३. तृतीय क्रमांक-आर.पी.डी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (रिया राजेश म्हालटकर व प्रेमलता प्रवीण सावंत)
या विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण प्रा. पवन वणवे, प्रा.संदीप पाटील, प्रा.आर .व्ही. सावंत, प्रा. दिपा सावंत, तर निबंध, वक्तृत्व व प्रश्न मंजुषा स्पर्धांचे परिक्षण महेश पेडणेकर, महाश्वेता कुबल, रमेश गावडे, आर.पी. सावंत, प्रीती सावंत, विशाखा पालव, शितल माजगावकर, नीता सावंत, आनंद राऊळ, राहुल सामुद्रे तर प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या संयोजनासाठी ऋषिकेश गावडे, प्रिती सावंत, प्राजक्ता मांजरेकर, संजय शेवाळे यांनी सहकार्य केले.
सर्व विजेत्यां स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.





