‘खालचीवडी येथे जातो.!’, सांगून परतलेच नाहीत .! ; साटेली तर्फ सातार्डा येथील वृद्ध बेपत्ता.!

185

सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथील इसम मनोहर यशवंत जाधव (वय – ६३ वर्षे, रा. साटेली तर्फ सातार्डा) हे शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३ पासून साटेली येथून दुपारी ३.३० च्या सुमारास खालचीवडी येथे जातो, म्हणून सांगून गेले ते अद्याप न आल्याने सातार्डा पोलीस ठाण्यात व गोवा- म्हापसा येथे शनिवार दि २ डिसेंबर २०२३ रोजी बेपत्ता म्हणून मुलगा अनिल जाधव यांनी नोंद केली आली.
मनोहर जाधव यांच्या अंगावर सफेद शर्ट व काळी पॅन्ट,हातात काठी,चष्मा असा पेहराव आहे.तरी कोणास सदर इसम दृष्टीस पडल्यास शरद जाधव (९४२०७९९१५६ / ९४०३०१४९१३) यांच्याशी संपर्क साधला.