मालवण, रत्नागिरी, देवगडसह कोकणातील किनारी भागांसाठी खास योजना.! ; पंतप्रधान मोदींची घोषणा.

120

मालवण : भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालवण इथं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्धाटन पार पडलं. यानंतर उपस्थितांना आणि विशेषकरुन कोकणवासियांना संबोधित करताना मोदींनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण या किनारी भागांच्या विकासकामांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आता सुरु झालं आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील विशेष योजना बनवण्यात येत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील रहिवासी भागांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मँग्रुव्ह्जचा भाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष ‘मिश्टी’ योजना बनवली आहे.