नाबर शाळेत मुलांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो : अर्चना घारे परब

बांदा : श्री मंगेश रघुनाथ कामत चारिटेबल ट्रस्ट संचालित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल मडूरा प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश रघुनाथ कामत, प्रमुख पाहुणे श्रीमती अर्चना घारे परब, सन्माननीय अतिथी श्री पुंडलिक धकुळ दळवी, श्री उदय सबाशेट चिंदरकर, पी.टी.ए उपाध्यक्ष श्री घनश्याम वालावलकर , लोकल कमिटी चेअरमन श्री भिकाजी एस धुरी, उद्योजक भाऊ वळंजू , डेप्युटी सरपंच मडूरा कृष्णा गावडे, माजी सरपंच राजेश गवस, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पित्रे सरभाऊ वाळजू, बांदा मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई मॅडम, शिक्षिका सौ.रसिका वाटवे, सौ. हेलन रॉड्रिक्स, व्ही.एन.नाबर, मडुरा मुख्यध्यापिका सौ प्रतीक्षा शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेचच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन, स्वागत गीत म्हटले . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ प्रतीक्षा शिरोडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका केले. त्यानंतर कु. तेजस्वी गावडे यांनी प्रशालेचा वार्षिक अहवाल वाचन केला.

प्रमुख पाहुणे सौ अर्चना घारे परब यांनी कामत चॅरिटेबल ट्रस्ट चे कौतुक करून २१ वर्षापूर्वी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा विचार करून या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देत असल्याचे सांगितले. या शाळेत येणाऱ्या सूक्त गुण ओळखून शिक्षक त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत मार्गदर्शन पालकांनीही करावे अशाप्रकारे त्यांनी विद्यार्थी व पालकांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक देखील केले. त्याच नंतर श्री मंगेश रघुनाथ कामत सर यांनी देखील खूप अनमोल असे मार्गदर्शन केले. सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वेलंकनी रॉड्रिक्स तर आभार कु.प्राची परब यांनी मानले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिक्षा शिरोडकर, सहशिक्षिका वैलंकनी रोर्ड्रिग्स, कु.तेजस्वी गावडे व कु. प्राची परब उपस्थित होते.