देवगड : रविवार दि. रोजी नांदगांव येथे एस टी वाहनाची वाट पाहत उभे असताना श्री. प्रकाश सुहास तेली. रा. (वय 42) राहणार कासार्डे यांना शाम खरात यांनी त्यांच्या (MH.07 – AD1641) अॅक्टीव्हाने जोरदार धडक दिली. यामध्ये श्री प्रकाश सुहास तेली हे गंभार जखमी झाले होते. त्यांच्यावर गोव्यात बांबुळी येथे उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या 3.10 वा. त्यांची प्राणज्योत मावळली.
स्व. प्रकाश तेली हे आंबा व्यवसायिक होते. ते अत्यंत मनमिळावू वृत्तीचे असल्याने त्यांचा मित्रपरीवार देखील खूप मोठा आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि व्यावसायिक यांना धक्का बसला असून त्यांच्या निधनाने घरचा कर्ता पुरुष गेल्याने परिवाराला प्रचंड मोठा धक्का बसला आहे.





