पर्यावरण संवर्धनासाठी एस. आर. दळवी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम.! ; वायंगणी समुद्र किनारी उद्या स्वच्छता मोहीम.

43

सावंतवाडी : पर्यावरण संवर्धनाचा वसा हाती घेतलेल्या राज्यस्तरीय एस. आर. दळवी फाऊंडेशनने (I)  उद्या २ डिसेंबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. हा उपक्रम २ ऑक्टबर रोजी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आला होता. तीच नियोजित स्वच्छता मोहीम आता २ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, वायंगणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेला दुपारी २. ०० वाजता प्रारंभ होणार आहे.

विलवडे गावचे सुपुत्र श्री. रामचंद्र दळवी आणि श्रीमती. सीता दळवी या दांपत्याने बहुउद्देशीय अशा राज्यस्तरीय एस. आर. दळवी (i) फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनने अग्रक्रमाने शिक्षक सक्षमीकरणासह पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये जल, ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. या प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एस. आर. दळवी (i) फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आहे. या स्वच्छता मोहिमेचे नियोजन एस. आर. दळवी फाऊंडेशन(I) चे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन मदने तसेच शिक्षक प्रशांत चिपकर आणि फाऊंडेशनची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा टीम करीत आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या या स्वच्छता मोहिमेत वायंगणी परिसरातील महिलांसह ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टीम आणि महाराष्ट्र राज्य कमिटी यांनी केले आहे.

या स्वच्छता मोहिमेत एस. आर. दळवी फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रामचंद्र ऊर्फ आबा दळवी, सौ. सीता दळवी, राज्याध्यक्ष महेश सावंत, वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ, वायंगणी सरपंच, दाभोली सरपंच, राष्ट्रीय हरितसेनेचे प्रमुख तसेच आदी उपस्थित राहणार आहेत.
या अभिनव उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्हयातील तमाम प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक शिक्षक,महाविद्यालयीन प्राध्यापक ,सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षणप्रेमी आदींनी उत्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन एस. आर. दळवी फाऊंडेशन( I) सिंधुदुर्ग यांनी केले एएएचई.