सावंतवाडी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सावंतवाडी शहरातील दुकाने आणि आस्थापने यांना दुकानांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत त्वरित सूचना देण्यात याव्या आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत दिलेल्या निवेदनानुसार सावंतवाडी नगरपरिषद यांनी याची तात्काळ दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शहरातील दुकाने व आस्थापने यांच्यावरील फलक पाट्या या मराठीत करणे संदर्भात येत्या आठ दिवसांत आपल्या पद्धतीने समाचार घेईल. या निवेदनाची प्रत माहितीसाठी पोलीस स्टेशन आणि व्यापारी संघटना यांना देखील देण्यात आली आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष
सुधीर राऊळ, परिवहन जिल्हाध्यक्ष अँड. राजू कासकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, अतुल केसरकर, विष्णू वसकर, पांडुरंग बुगडे, जय राऊळ, काशिराम गावडे, नरेश देऊलकर (ग्रा.पं. सदस्य, आरोंदा), चिन्मय नाडकर्णी, श्रीराम सावंत, जय सावंत, केतन सावंत, सत्यवान सावंत,
श्रीराम सावंत, अंकुश सावंत आदी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज सावंतवाडी शहरातील आस्थापना, दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत कराव्यात! ; नगरपरिषदेला ‘मनसे’ निवेदन.!





