कणकवली : रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १९ वर्ष गटातील मुलींच्या शालेय कॅरम स्पर्धेत कुमारी दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल प्राप्त केले. दीक्षा ही कनेडी हायस्कूलची राष्ट्रीय खेळाडू असून तिने यापूवी दोन वेळा राज्याचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे. तिला शिक्षक मकरंद आपटे, गौतम यादव व क्रीडा शिक्षक बयाजी बुराण सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या अलौकिक यशाबद्दल तिचे संस्थाध्यक्ष सतीश सावंत यांनी तसेच सर्व संचालक मंडळ व शालेय समिती चेअरमन आर. एच.सावंत व सदस्य मुख्याध्यापक प्राचार्य एस. डी. दळवी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





