गुवाहाटीमध्ये ऋतु’राज’! ; भारताने ऑस्ट्रेलियाला दिले २२३ धावांचे लक्ष्य.

74

गुवाहाटी : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अजेय आघाडी मिळवेल.  भारताने ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या.

ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय तिलक वर्माने 24 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 59 चेंडूत 141 धावांची नाबाद भागीदारी झाली.

ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला दिले. 20 वे षटक मॅक्‍सवेलचे पहिले षटक होते आणि या षटकात ऋतुराजने तीन षटकार आणि एक चौकार मारला. भारताने 20व्या षटकात 30 धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 223 धावा कराव्या लागतील.