सावंतवाडी : महाराष्ट्र माध्यमिक शाळा कर्मचारी राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या कोल्हापूर विभाग सचिवपदी शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरपिठा, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील वरिष्ठ लिपिक गजानन द्वारकानाथ नानचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्याच्या सर्व जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या महामंडळाची सन २०२३-२०२६ या कालावधीसाठी साने गुरुजी स्मारक पटवर्धन हायस्कूल पुणे येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणूक प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा – सचिव गजानन द्वारकानाथ नानचे – शिवाजी हायस्कूल पणदूर तिठा – प्रशालेचे लिपिक कोल्हापूर – विभागातील पाच जिल्ह्याच्या विभागीय – सचिवपदी निवडणूक रिंगणात होते. त्यांची कोल्हापूर विभागीय सचिव म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनिल माने (सातारा) यांची तर राज्य सरकार्यवाहपदी शिवाजी खांडेकर (पुणे) व इतर तेरा पदांची बिनविरोध निवड झाली. चार पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून आठ मतदार असतात. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनिल राणे, वैभव केंकरे, प्रदीप सावंत, शाबी तुळसकर, निलेश पारकर, पंढरीनाथ आचरेकर, विजय गवस हे मतदार होते. तर त्या मतदारांची शिफारस करण्यासाठी बळीराम सावंत, कृष्णा लोंढे, सुहास देसाई, लाडू जाधव, गणेश देसाई उपस्थित होते, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्याचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन नानचे यांची कोल्हापूर विभाग सचिवपदी निवड झाल्याचे समजताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी वर्गामध्ये मोठा उत्साह पसरला आहे. तसेच त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय सचिव पद मिळाल्याने पाचही जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेला बळकटी मिळणार आहे.





