वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ – २४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १३००० कोटी रुपये खर्चाची विश्वकर्मा योजना मंजूर केली . याद्वारे पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळणार आहे . पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार , लोहार , नांभीक , चांभार , सुतार , होडी बनवणारे , मातीची भांडी आणि इतर वस्तु बनवणारे कुंभार , शिल्पकार , गवंडी , माशांचे जाळे बनविणारे , खेळणी बनविणारे यासारखी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत . पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर आणी कारागीरांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणे आणी त्यांनी तयार केलेली स्थानिक उत्पादने , कला आणी हस्तकलेच्या माध्यमातून भारताची परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणे हे मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे . याचा ओबीसी समाजाने फायदा घ्यावा , असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी केले .
वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात ओबीसी मोर्चाची बैठक प्रदेश कार्यकारिणी सदस्य व ओबीसी समाजाचे शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी मान्यवरांचे स्वागत बाबली वायंगणकर , रमेश नार्वेकर व शरद मेस्त्री यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले.
यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , विश्वकर्मा समाज जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री , परबवाडा सरपंच शमिका बांदेकर , ग्रामपंचायत सदस्या कार्तिकी किरण पवार , मेस्त्री समाजाचे बाबुराव मेस्त्री – संतोष मेस्त्री – महादेव मेस्त्री – महेश मेस्त्री – सोमा दत्ताराम मेस्त्री , सुवर्णकार समाजाचे रसिका मठकर – प्रमोद वेर्णेकर – सुनील मठकर , तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार , वैश्य समाजाचे रविंद्र शिरसाठ व चंद्रशेखर काणेकर , भंडारी समाजाचे विजय बागकर – शशिकांत करंगुटकर – समीर कुडाळकर – प्रशांत नवार – सुहास नवार – राजन पडवळ – गोविंद मांजरेकर – स्वप्नील नवार , *नांभीक समाजाचे* मारुती कुडाळकर , *परीट समाजाचे* उमेश आरोलकर – विजय खानोलकर , *तेली समाजाचे* मयुर वेंगुर्लेकर इत्यादी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते .





