सावंतवाडीत क्रिकेट प्रेमी लुटताहेत मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचा आनंद.!

42

सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या काठी आज ऑस्ट्रेलिया आणि भारताचा विश्वचषकाचा अंतिम सामना चांगलाच रंगू लागला आहे. क्रिकेटप्रेमी मोठ्या स्क्रीनवर सामन्याचा आनंद लुटत आहेत. प्रत्येक चेंडू टाकल्यावर क्रिकेट प्रेमी भारतीय गोलंदाजांना समर्थन देत असून यंदाचा वर्ल्ड कप भारत जिंकणार अशी अपेक्षा तमाम क्रिकेटपटूंना लागली आहे.