चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न.! ; आरोपीवर चोरीचा आहे गुन्हा.

92

कणकवली : एका चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशयावरून एका संशयित व्यक्तीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात बोलवले होते. संदीप प्रभाकर राऊत (३७, रा. कलमठ – बिडयेवाडी, मूळ निरोम – मालवण) असे त्या संशयत तरुणाचे नाव आहे. त्याने वाघेरी व फोंडाघाट येथील मंदिरांमध्ये घंटा चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर संदीप राऊत यांने पोलीस स्थानकातील बाथरूममध्ये जाऊन फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संदीप राऊत याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस रामचंद्र शेळके यांनी दिली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.