- सावंतवाडी : सद्या सर्वत्र दिवाळीचं पर्व सुरू आहे. लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वजण दिवाळीचा आनंद लुटत आहेत. अनेक जण एकमेकांना आनंदोत्सवाच्या शुभेच्छाही देत आहेत सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनीही आपल्या शुभेच्छा ‘महाराष्ट्र माझा’च्या माध्यमातून नागरिकांना व त्यांच्या हितचिंतकांना आणि शेतकरी बांधवांना दिल्या. सदर शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या बाजूला असलेल्या छोट्याशा पण अत्यंत गोड नातू कुलदीप यानेही स्मितहास्याद्वारे एक प्रकारे आपल्या गोड गोड दिवाळीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, प्रसाद कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर तसेच समस्त कोरगावकर परिवार व ‘महाराष्ट्र माझा’ची टीम उपस्थित होती.





