- मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी ट्वीट शेअर करुन पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली आहे.
यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे विजेते- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार : श्री. सुरेशजी वाडकर (2023)
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 1) श्रीमती सुहासिनीजी देशपांडे (2022 )
चित्रपट :
1) श्री चेतन दळवी (2022)
2) श्रीमती निशिगंधा वाड (2023)
कीर्तन प्रबोधन:
1) श्रीमती प्राची गडकरी (2022)
2) श्री. अमृत महाराज जोशी (2023)
वाद्य संगीत:
1) पं. श्री. अनंत केमकर (2022)
2) श्री शशिकांत सुरेश भोसले (2023)
कलादान:
1) श्रीमती संगीताजी राजेंद्र टेकाळडे ( 2022)
2) श्री यशवंत रघुनाथ तेंडोलकर (2023)
तमाशा
1) श्री बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) (2022)
2) श्रीमती उमा खुडे (2023)
आदिवासी गिरीजन:
1) श्री. भिकल्या धाकल्या दिंडा (2022)
2)श्री सुरेश नाना रणसिंग (2023)





