मी माझ्या सावंतवाडी मतदारसंघातूनच आमदारकी लढविणार.! – मंत्री दीपक केसरकर.

120
  • सावंतवाडी : माझ्या गैरहजेरीत काही जण माझ्याबद्दल अफवा पसरवीत आहेत. मी खासदारकी लढविणार वगैरे या साऱ्या अफवा असून मी माझ्या सावंतवाडी मतदारसंघातूनचं आमदारकी लढविणार असून माझ्या मतदार संघाच्या विकासाबद्दल मला प्रचंड चिंता आहे. त्या अनुषंगाने मी वेळोवेळी निधी आणलेला आहे, अजूनही काही प्रश्न प्रलंबित असून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध आहोत.  काही गावांच्या जटील समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. लवकरच त्यांना निधी वितरित होईल आणि त्याही गावांची समस्या सोडविली जाईल. मात्र मी माझ्या मतदारसंघात आमदारकीची निवडणूक लढविणारच, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केले.

दरम्यान त्यांनी कोणाचेही नाव न घेता जे आमदारकी मिळविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत त्यांना सावंतवाडीचे सुज्ञ मतदार चांगले ओळखतात म्हणून त्यांनी माझ्या अपप्रचारापेक्षा स्वतःला सिद्ध करावे असेही कोणाचेही नाव न घेता मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.