माजी सभापती निलेश सामंत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट.! ; विकासात्मक उपक्रमांवर झाली चर्चा.

89

वेंगुर्ला : परुळे विमानतळ नजीक मिनी MIDC स्थापन करणेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची माजी सभापती निलेश सामंत यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी लवकरच निर्णय जाहीर करू, असे आश्वासन सामंत यांना दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक विकासात्मक उपक्रमांवर भेटी दरम्यान चर्चा झाली. यावेळी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी सभापती निलेश सामंत यांसह अधिकारी वर्ग उपस्थित होते.