दीपावलीनिमित्त कास वाघबिळकर मित्रमंडळाने केले डबलबारीचे जंगी आयोजन.

60

बांदा : दीपावलीचे औचित्य साधून कास वाघबिळकर मित्रमंडळाने 20×20 डबलबारी जंगी सामन्याचे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रात्री ठिक 8 वाजता या जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामना विनादेवी प्रासादीक मंडळ उंडील गुरुवर्य बुवा प्रकाश पारकर बुवा – श्री. व्यंकटेश नर यांच्यात रंगणार असून पखवाज सागर कदम, तबला भावेश लाड विरूध्द श्री. कोटेश्वर नवतरूण भजन मंडळ हरकुल बु. ता.कणकवली गुरूवर्य श्री.प्रमोद हर्याण बुवा – श्री.अभिषेक शिरसाट पखवाज- रूपेश परब तबला – अभिषेक सुतार यांच्यामध्ये होणार आहे. डबलबारी प्रेमी, भजन प्रेमी तसेच बांदा दशक्रोशी, मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वाघबिळकर मित्र-मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.