बांदा येथे आकाशकंदील स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद.! ;रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथचे आयोजन.

28

बांदा : रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा तर्फे लहान मुलांसाठी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास 100 मुलांनी भाग घेत स्पर्धा यशस्वी केली. यावेळी एकूण 10 विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – सिमरन सागर बांदेकर
द्वितीय क्रमांक – प्राची प्रसाद यादव
तृतीय क्रमांक – शुभ्रा सागर तेली
चतुर्थ क्रमांक – तनिष्का संदीप देसाई
पाचवा क्रमांक – हर्षल श्यामसुंदर वरग
तसेच शिवम राजन कदम, नाजुका आरिफ खान, साईश सागर बांदेकर, आर्या पिराजी शिंगाडे, आर्या दत्ताराम चव्हाण यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, शिवम गावडे, विनिता कुबडे ईश्वरी कल्याणकर, शाळेचे शिक्षक जे. डी. पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.
आजकाल बाजारात प्लास्टिक आकाशकंदील सहज उपलब्ध होत असल्याने मुलांना पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्याचे रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी म्हटले. आभार जे. डी. पाटील यांनी मानले.