- वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या घोडेमुख पेंडूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार संतोष गावडे यांनी शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार देवा कांबळी यांच्यावर 104 मतांनी विजय संपादित केला.देवा कांबळी हे मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने कांबळी यांचा पराभव हा दीपक केसरकर यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.देवा कांबळी हे घोडेमूखं पेंडूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सौ. कांबळी यांचे पती आहेत.तसेच नऊ पैकी सहा सदस्य हे भाजपचे आल्याने एक हाती सत्ता घोडेमूखं पेंडूर ग्रामपंचायत वर बीजेपी ने मिळवलेली आहेत.
-
तसेच मातोंड ग्रामपंचायत वर सरपंच पदाच्या भाजपच्या उमेदवार मयुरी वडाचेपाटकर
ह्या विजयी झाल्या असून नऊ पैकी सात सदस्य भाजपचे निवडून आल्याने मातोंड ग्रामपंचायतवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे.
Home ब्रेकिंग न्यूज घोडेमुख पेंडूर, मातोंड ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, पेंडूर सरपंचपदी संतोष गावडे, ...





