सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ सरपंच पदासाठी ६८ तर १३२ सदस्य पदासाठी ३६४ उमेदवाराचे भवितव्य रविवारी ठरणार.! ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्पात, अटीतटीची दुरंगी-तिरंगी लढत ; प्रशासकीय यंत्रणा सज्ज.!

76

सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या तर ५२ ग्रामपंचायत पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासाठी ३६ तर सदस्य पदासाठी ७३ असे १०९ अर्ज मागे घेतले असून २४ ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ६६ उमेदवार तर ७६ सदस्य पदासाठी ३२४ उमेदवाराचे तर पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या ५ जागांपैकी २ जागांसाठी निवडणूक होत असून ५६ सदस्य संख्येत फक्त २२ उमेदवाराचे भवितव्य रविवारी  ५ रोजी ईव्हीएम पद्धतीने सिलबंद होणार आहे. निवडणूक होणाऱ्या या गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्यात असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ३९० पोलीस ७८ मिळून ५०९ निवडणूक कर्मचारी ७८ मतदान केद्रावर उद्या गावागावात पोहोचणार आहे .

राज्य निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या ,त्यात ६ तालुक्यात ७६ सदस्य संख्या साठी ४१७ तर २४सरपंच पदासाठी १०३ अर्ज दाखल झाले होते या छाननीमध्ये देवगड तालुक्यातील सरपंच पदासाठी १ आणि सदस्य पदासाठी २ असे ३ अर्ज बाद ठरले होते ,अर्जमागे घेण्याच्या कालच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी १०३ अर्जापैकी ३६ अर्ज मागे घेतले असून ४१७ सदस्य पदअर्जा पैकी ७३ अर्ज मागे घेतले होते . प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका होणाऱ्या सार्वत्रीक२४ ग्रामपंचायती पैकी सरपंच पदाचे ६६ उमेदवार आहेत त्यात देवगड तालुक्यातील ९ सरपंच पदासाठी १९ तर २८ सदस्य पदासाठी १०९ , मालवण तालुक्यात १ सरपंच पदासाठी ३ , तर ५ सदस्य पदासाठी २९ अर्ज ,कणकवली तालुक्यात २ सरपंच पदासाठी ५ तर ६ सदस्य पदासाठी १९ अर्ज ,कुडाळ तालुक्यात ५ सरपंच पदासाठी १९ अर्ज तर १५ सदस्य पदासाठी ७ ८ अर्ज , वेंगुर्ले तालुक्यात ४ सरपंच पदासाठी १३ तर १२ सदश्य पदासाठी ७३ अर्ज , दोडामार्ग तालुक्यात ३ सरपंच पदासाठी ७ तर१० सदस्य पदासाठी ३४ अर्ज रिंगणात आहेत .त्यामुळे या सार्वत्रिक निवडणुकीत २४ सरपंच पदासाठी ६६ उमेदवार रिंगणात आहेत तर ७६ सदस्य पदासाठी ३४२ उमेदवार रिंगणात आहेत या अटीतटीशी दुरंगी आणि तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे
.प्रत्येक उमेदवाराला चिन्ह देण्यात आल्याने प्रचाराला चांगलीच रंगत . आली होती आचरा , हुमरमळा सारख्या अन्य काही ग्रा .प मध्ये चुरशीच्या लढती आहेत.

पोटनिवडणुकीत २ सरपंच तर २२ सदस्यांसाठी निवडणूक –

ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूका सात तालुक्यात होत आहेत , या पोटनिवडणुकीमध्ये ५ सरपंच आणि ५६ सदस्य पदासाठी अशा ६१ पदाच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या .मालवण तालुक्यात २ ग्रा प सरपंच पदाची निवडपूक आहेत परंतु ५ पैकी ३ सरपंच पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत , ५६ पैकी ११ पदाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत ,या पोटनिवडणुकीत सरपंच पदाच्या २ ग्रामपंचायतीची तर २२ सदस्य पदाच्या निवडणुक होत आहे , या रिंगणातील प्रत्येक उमेदवाराला चिन्ह देण्यात आले होते प्रचार यंत्रणा मध्ये चुरस दिसुन आली उद्या ५ नोव्हेंबर रोजी या सार्वत्रिक आणि पोट निवडणूक होत आहेत त्यामध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रत्येक गावामध्ये सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला होता ठाकरे उ बा ठा शिवसेना आणि भाजपा यांच्यातच खरीलढत असुन शिदे शिवसेना काहीगावात आपला पायरोहण्याचा प्रयत्नशील आहे त्यातही त्याना यश येत आहे .
सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच ६६ सदस्य ३४२ एकून ४०८ तर पोट निवडणुकीत सरपंच पदाचे २ आणि सदस्य पदाचे २२ मिळून २४ उमेदवार रिंगणात आहे या निवडणुकीत प्रत्येक गावातील पक्षनिष्ठा आणि पक्षाचे बलाबल याची गणिते मांडली जाणार असून यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा यांच्यातच खरी लढत प्रतिनपणाला लागणार आहे शिंदे गटाच्या शिवसेनेने काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत परंतु खऱ्या अर्थाने भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसेना यांच्यात खरी लढत दिसून येत आहे या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये त्या गावातील विकास कामे आणि पक्ष बला बल यांचे भवितव्य निश्चित होणार आहे

७८ मतदान केंद्रावर ५०९ कर्मचारी

जिल्हयातील ग्रा प ७ ८ मतदान केंद्रांवर ५०९ कर्मचारी नेमणूक केले आहेत तर ४१ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत उद्याच्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांवर ३९० कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी ७८ मिळून ५०९ कर्मचारी नेमण्यात आले आहेत ईव्हीएम पद्धतीनेहोणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राखीव ४ १ कर्मचारी तर जादा ईव्हीएम मशीन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सार्वत्रिक ग्रा.प. मध्ये कुडासे खुर्द एक ग्रामपंचायत तर जिह्यातील१४ सदस्य बिनविरोध –
ग्रामपंचायतच्या या सार्वत्रिक निवडणुकीत कुडासे खुर्द ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध आली असून अंतिम अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत १४ ग्रामपंचायत मधीलप्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य बिनविरोध झाले आहेत यात वैभवाडी तालुक्यातील मौदे ,आखवणे भोम हेत ,ऐणारी ,मालवण तालुक्यातील तोंडवली , देवगड तालुक्यातील गोवळ ,इळये ,दोडामार्ग आंबडगाव ,सावंतवाडी तालुक्यातील सातोसे कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली कणकवली तालुक्यातील फोंडाघाट , लोरे ,वांयंगणी , शेर्पे आदी प्रत्येक एक प्रमाणे14 सदस्य बिनविरोध झाले आहेत त्यामुळे निवडणुकी झाला आहे

या सार्वत्रिक २३ ग्रामपंचायतींच्या निवडणूका –

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्याजिल्ह्यातील 23 ग्रामपंचायती असून देवगड तालुक्यातील वळीवंडे , शिरवली, रामेश्वर ,फणसगाव ,विठ्ठलदेवी , वानिवडे , ठाकूरवाडी , मालवण तालुक्यातील आचरा , कणकवली तालुक्यातील ओटव ,बेळणे खुर्द ,दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी ,बोडण ,वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर , मातोंड ,खानोली , वायंगणी ,कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा अणाव , हूमरमळा वालावल , वालावल ,भडगाव बुद्रुक वर्दे आधी सार्वत्रिक २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे तर पोट निवडणुकीत मालवण तालुक्यातील चाफेखोल , कुडाळ तालुक्यातील गावराई , तेंडोली , कणकवली तालुक्यातील हळवल ,वारगाव आदी ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.