स्वयं-सहायता गटातील पात्र महिला बनणार सक्षम.! ;ओरोस येथे ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ भरती मोहीम.

87

सिंधुदुर्ग : उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ओरस जिल्हा परिषद कार्यालयात दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘एक ग्रामपंचायत एक बीसी सखी’ ही व्यापक भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या दरम्यान पार पडणार असून स्वयं-सहायता गटातील पात्र महिलांना प्रमाणित बीसी सखी किंवा बँकिंग एजंट बनवण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.

ही भरती मोहीम “एक ग्रामपंचायत, एक बीसी सखी” हे राज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आहे. निवडलेल्या महिलांना प्रशिक्षण, प्रमाणपत्र, व बँकेद्वारे नियुक्त केले जाईल आणि बीसी सखी म्हणून कार्यरत केले जाईल. वुमेन्स वर्ल्ड बँकिंगने या प्रयत्नांना गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोबत भागीदारी केली आहे. किमान 10वी पास तसेच आधार कार्ड, बँक कर्जावर डीफॉल्ट नसणे आणि स्मार्ट फोन चा वापर करता आला पाहिजे अशा अटी पात्र उमेदवारांसाठी असणार आहेत.
अधिक माहितीसाठी सचिन खोपडे ९८६०९७१७०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.