वेंगुर्ला वाघेश्वरवाडी येथील श्रीदेवी सप्तशृंगी मंदिरात रविवारी होणार वर्धापन दिन सोहळा..!

41

वेंगुर्ले वेंगुर्ला (वाघेश्वरवाडी, उभादांडा) येथील श्री देवी सप्तश्रृंगी निवासीनी मंदिरांत  रविव‍ारी ५ नोव्हेंबर रोजी१४ वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक क‍ार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८वाजता श्री देवी सप्तश्रृंगी निवासीनी व पंचायतन   देवतांस महाआभिषेक व महापुजा,९ वाज‍ता- हवन याग,दुपारी १२.३० वाजाता पुर्णाहुती,कुमारीका पुजन,दुपारी १ वाज‍ता महाआरती,दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद,सायंकाळी ५ नंतर स्थ‍ानिक भजने व विविध कार्यक्रम तरी सर्व ग्रामस्थ ,भाविक,भक्तमंडळीनी कार्यक्रमास उपस्थित राहण्य‍ाचे आवाहन प.पू.श्री मनोहर पेडणेकर महाराज यांनी केले आहे.