आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी ‘भाऊबीज भेट – एक नवी साडी’ उपक्रम.! ; कोकण कट्टा विलेपार्ले (पूर्व) संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

31

सावंतवाडी :  दीपावलीनिमित्त आपण दररोज आनंदोत्सव साजरा करतो पण याच कालावधीत आदिवासी पाड्यातील भगिनी मात्र या आनंदोत्सवापासून कोसो दूर असतात. अशा वंचित असलेल्या पेण, मोखाडा, विक्रमगड विभागातील दुर्गम पाड्यातील भगिनींसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या आदिवासी पाड्यातील भगिनींना आनंद देण्यासाठी आणि त्यांचीही दिवाळी साजरी व्हावी, यासाठी सेवार्थ उपक्रमांची चळवळ असलेल्या कोकण कट्टा विलेपार्ले (पूर्व) या संस्थेने पावलं उचलली आहेत. आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी भाऊबीज भेट म्हणून ‘एक नवी साडी’ हा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविला आहे. यासाठी त्यांनी समाजातील संवेदनशील व्यक्तींना ‘एक साडी’ कोकण कट्टाकडे सुपूर्द करावी व दहा नोव्हेंबर पूर्वी सदर साडी स्वच्छेने कोकण कट्टा या संस्थेकडे भेट म्हणून द्यावी, असे आवाहन संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव सुनील वनकुंद्रे, खजिनदार सुजित कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व साडी भेट देण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

9323229074,
9167279539,
7777093227,
9664691144,
9869421980,
9820903243.