हिंगोली: मराठा आरक्षणासाठी राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नहाद गावातील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणाने चिठ्ठी लिहत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं.
आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत म्हटलंय की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.





