लेविस्टन : अमेरिकेच्या मेन स्टेटच्या लेविस्टन शहरात बुधवारी रात्री बेछूट गोळीबारात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले होते. तेव्हापासून संशयित आरोपी हल्लेखोराचा शोध घेतला जात होता. मात्र आता या हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला होता आणि त्याचा शोध घेतला जात होता. दोन दिवसांनंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना आरोपी मृत आढळला आहे. याबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही, मात्र अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.
यापूर्वी, सुरक्षा अधिकार्यांनी फेसबुकवर संशयित हल्लेखोराचे रायफलसह दोन फोटो शेअर केले होते आणि संशयिताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.