तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाची कारवाई…!
मालवण : येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने आज पहाटे धडक कारवाई करताना अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर नांदरुख मार्गावर पकडले. तिन्ही डंपर तहसील कार्यालय परिसरात नेण्यात आले आहेत.
दरम्यान मालवण कुपेरीच्या घाटी येथे मालवणच्या दिशेने विनापरवाना खडीची वाहतूक करणारा डंपर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री पकडला. दुपारचा पास आहे असे सांगून गाडी नादुरुस्त असल्याचे चालकाने सांगितले. मात्र त्यानंतर गाडी पळवून नेल्याने चालकाने गाडी नादुरुस्त असल्याचा बनाव केल्याने त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले.




