सावंतवाडी मतदार संघातील ज्वलंत विषयांवर खा. सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधणार.! – अर्चना घारे. ; सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये सौ. सुळे आणणार नवचैतन्य.

43

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत. यानिमित्ताने त्यांचा दोडामार्ग येथे मेळावा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
दरम्यान, सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, दोडामार्गचा हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधण्यात येणार असून दोडामार्ग, बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आज येथे दिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांसह राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच दोडामार्ग येथे सभा झाल्यानंतर सौ. सुळे या सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन अर्चना घारे यांनी केले आहे.