कणकवली : मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ व ‘स्टार्ट अप’ या योजना सुरू केल्यामुळे कामगारांना अच्छे दिन पहायला मिळाले. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योगधंद्यांना लागणारया पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला , त्यामुळे देशात उद्योगवाढीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे . गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या आहेत. कामगार विषयक कायद्यात केलेल्या सुधारणा , परवाने आणि लायसन्स मिळण्यासाठी सुटसुटीत ई परवाना पद्धती , यामुळे गुंतवणूक स्थळ म्हणून भारताचे स्थान उंचावले आहे. यामुळे रोजगार निर्मिती झाली व कामगारांना काम मिळाले.
मोदी सरकारच्या ई – श्रम कार्ड मुळे असंघटित कामगारांना आर्थिक सुरक्षा मिळाली . ई – श्रम कार्ड अंतर्गत कामगारांना सरकारी योजना सहज मिळू लागल्या. त्यामुळे असंघटित कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय दौरा करून कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , कामगार मोर्चा सिंधुदुर्ग अध्यक्ष अशोक राणे , रत्नागिरी भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस उदय गोवळकर, ज्येष्ठ पदाधिकारी निलेश तेंडोलकर, जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे, सेवा शक्ती संघर्ष एस.टी.युनियनचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष भाट इत्यादी उपस्थित होते .
Home महाराष्ट्र कणकवली भाजपा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील कामगारांना न्याय देणार!- लिलाधर भडकमकर. ; कोकण...





