गवा रेड्यांनी दिले भर वस्तीत दर्शन…!

सावंतवाडी : मुंबई गोवा हायवे सावंतवाडी येथील बाहेरचा वाडा या ठिकाणी रात्री 1 वाजता च्या सुमारास चक्क आठ ते दहा गवा रेड्यानी हायवे वरून जाणाऱ्या वाहन चालकांना दर्शन दिले. यावेळी एका वाहन चालकाने आपली गाडी थांबवून या गव्या रेड्यांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. चक्क भर वस्तीत आता गवारेडे आल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लवकरच या गवा रेड्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.