शिवम सहकार पॅनल विरूध्द सहकार समृध्दी पॅनल…!

देवगड : देवगड अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणुक रविवार दि. २९ जानेवारी रोजी होत आहे. एकूण १३ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली असुन उर्वरीत १२ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम सहकार पॅनेल विरूध्द शिवसेना काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनल या दोन पॅनलमध्ये होत आहे. कुडाळ, कासार्डेसह देवगड तालुक्यातील ८ अशा एकूण १० मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान होणार असून ११,५०२ सभासद मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

देवगड अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी शिवम सहकार पॅनलमध्ये सर्वसाधारण गटातून सदाशिव ओगले, प्रकाश राणे, अभय बापट, अ‍ॅड.अभिषेक गोगटे, डॉ.अमोल तेली, दिनेश नंदकुमार घाटे, समीर पेडणेकर, महिला राखीव गटातून सौ.वैशाली तोडणकर, ललिता शेडगे, इतर मागास प्रवर्ग गटातून महादेव उर्फ बाबा आचरेकर, अनु.जाती/जमाती गटातून सुरेंद्र चव्हाण, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून संजय बांदेकर हे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या पॅनलचे सर्वसाधारण गटातील देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल उर्फ बंड्या सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत.

तर सहकार समृध्दी पॅनलमधून सर्वसाधारण गटातून अब्दुल रशिद अली खान, उल्हास मणचेकर, संतोष तारी, किरण टेंबुलकर, रघुवीर वायंगणकर, महिला राखीव गटातून विशाखा मांजरेकर, सुगंधा साटम, इतर मागास प्रवर्ग गटातून मनोज पारकर, अनु. जाती/जमाती गटातून सुरेश देवगडकर, भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून धनंजय जोशी हे उमेदवार आहेत.

रविवारी सकाळी ८ पासुन मतदानाला सुरूवात होणार असून कुडाळ, कासार्डे, नारींग्रे, पडेलध्ये २ व देवगडधील ५ अशा एकूण १० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. ३० जानेवारी रोजी देवगड अर्बन बँक देवगड कार्यालयात होणार आहे. या निवडणुकीसाठी माणिक सांगळे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून व सहाय्यक निंबधक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.