फटाके हातातच फुटल्याने बालक गंभीररित्या भाजला.! ; देवगड तालुक्यातील मुटाट पाळेकरवाडी येथील घटना.

86

देवगड : तालुक्यातील मुटाट पाळेकरवाडी येथील सुबोध संदीप पाळेकर (वय १०) हा मुलगा रविवारी दुपारी फटाके फोडत असताना फटाके हातातच फुटल्याने गंभीररित्या भाजला. त्याला उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुबोध रविवारी दुपारी फटाके वाजवत होता. त्यावेळी त्याच्या हातातचं फटाके  फुटल्याने त्याचे हात, पाय व चेहरा भाजला. त्याला तात्काळ फणसगाव आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्याने त्याला पुढील उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.