बंगळुरू : आज क्रिकेट विश्वचषकाच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना आज बंगळुरूमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने 62 धावा राखून विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर आपल्या वादळी खेळीमुळे सामनावीर खेळाडू ठरला. त्याचसोबत गोलंदाजांचेही या विजयात महत्वाचे योगदान राहिले.




