वेंगुर्ला: तालुक्यातील मातोंड येथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सद्या भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या ओढीमुळे, लोकप्रियतेने आणि भारताचे पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात होत असलेल्या लोकोपयोगी योजनांच्या आधारे विकास यामुळे प्रभावित होऊन मातोंडमधील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षमध्ये जाहीर प्रवेश केला असल्याचे सांगितले.
यावेळी वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, मातोंड शक्तिकेंद्र प्रमुख सोमा मेस्त्री, सुभाष परब आदी उपस्थित होते. तर प्रवेशामध्ये सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, आनंद परब, नंदकिशोर परब, प्रशांत परब, राजन परब, सुरेंद्र परब, नितीन परब, राहुल प्रभू, विकास परब यांचा समावेश आहे.





