देवगड : सोमवार दि. १६/१०/२०२३ रोजी १४ वर्षाखालील मुले कबड्डी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ओरोस येथे पार पडल्या. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्तद संघ सहभागी झाले होते. यामध्ये पुन्हा एकदा.महात्मा गांधी विद्या मंदिर, तळेबाजार हायस्कूलने अंतिम सामन्यात मालवण संघावर ३९-२७ अशा गुणफरकाने मात करत विभागस्तरापर्यंत मजल मारली. या सर्वांना संघ व्यवस्थापक श्री. तेली सर, क्रीडा शिक्षक श्री. कदम सर, माजी विद्यार्थिनी कु. प्रेरणा कुळकर्णी, मानसी लब्दी, कु. मानसी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व खेळाडूंना श्री. रोहित म्हापसेकर यांच्याकडून जर्सीचे वाटप करण्यात आले होते.
या सर्वांचे प्रशालेचे चेअरमन तथा दानशूर व्यक्तिमत्व श्री. संदीपशेठ तेली, खजिनदार श्री. संतोष वरेरकर, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र म्हापसेकर, सचिव श्री. कृष्णा साटम व सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक श्री. आर. ए. घोगळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





