सावंतवाडी : तालुक्यातील श्री देवी माऊली मंदिर रोणापालच्या नवरात्रौत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोणापालच्या नवरात्रौत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान श्री देवी माऊली मंदिर, रोणापाल येथे सदर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
असे रंगणार रोणापालच्या नवरात्रौत्सवात कार्यक्रम –
रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ७.०० वा. – सत्संग
पुरस्कर्ते: श्री. प्रदीप गणेश नाईक
सोमवार दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ७.०० वा. – स्थानिक भजने
पुरस्कृत कै. सूर्यकांत देऊलकर व कै. श्रीधर न्हानू देऊलकर यांच्या स्मरणार्थ श्री. विजय सुर्यकांत देऊलकर यांजकडून
मंगळवार दि. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ७.०० वा. – निमंत्रित भजने
पुरस्कर्ते : श्री. नंदकिशोर राजाराम नेमण
बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. – विघ्नहर्ता दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा दशावतार नाट्यप्रयोग
पुरस्कर्ते : श्री. विवेक पारटे
गुरुवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. जादूगार केतन कुमार यांचे जादूचे प्रयोग
पुरस्कर्ते : श्री. सागर विलास गुरव – बेंगरुळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापुर
शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. – जुगलबंदी हरीनामाची
बुवा श्री. रुपेंद्र परब व बुवा श्री. अमित तांबोळकर
पुरस्कर्ते: श्री. तानाजी महादेव गावडे व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ
शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. – श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ
पुरस्कर्ते : श्री. नारायण (बबन) राणे- शिवसेना तालुका प्रमुख व श्री. राजन परब – शिवसेना इन्सुली विभाग
रविवार दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. – स्वामी दयासागर छात्रालय व स्थानिक कलावंताचे कार्यक्रम
पुरस्कर्ते : श्री. सुरेश परब एस्.एस्. इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर, मडुरा
सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ८.०० वा. खास महिलांकरिता खेळ पैठणीचा (होम मिनिस्टर)
पुरस्कर्ते : श्री. प्रशांत प्रकाश गावडे व श्री. सुदिन मोहन गावडे
मंगळवार दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.०० वा. – वणी, देवलग्न व दसरोत्सव.






