API सागर खंडागळे, PSI सूरज पाटील निलंबित, SP सौरभकुमार अग्रवाल यांची कारवाई.! ; लाच प्रकरण भोवले.

182

सावंतवाडी : लाचलुचपत विभागाने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे याला अटक केली तर पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दोघांनाही निलंबित केले आहे. तसेच दुसऱ्या प्रकरणात साक्षीसाठी न्यायालयात गेलेले पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.