युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने साजरा.!

110

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा सुप्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात साजरा झाला. यावेळी युवा नेते विशाल परब यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच वाढदिवसाचा केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच त्यांच्या भावी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी, सचिव विष्णू चव्हाण, मीडिया सेल अध्यक्ष आनंद कांडरकर, वासुदेव सावंत, सूरज कांडरकर, सावित्री पालेकर तसेच अन्य शुभचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते.