सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल पावणाई मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेदिवशी उद्या रविवारी १५ रोजी रात्री आठ वाजता दशावतारातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक मयुर गवळी यांच्या यू ट्युबवर गाजलेल्या दशावतारातील गाण्यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यात त्यावेळच्या दशावतार नटसम्राटांची माहिती आणि त्यांचे अनुभव, जुनी-नवीन लोक आवडीची गाणी सादर होणार आहेत. तसेच या मैफिलीत दशावतारातील जुन्या गमतीदार आठवणी, डायलॉग आणि यू ट्युबवर लाखो चाहत्यांची पसंती मिळालेली मयुर गवळी यांची गाणी ते स्वतः सादर करणार आहेत. या मैफिलीचे निवेदन जिल्ह्यातील नामवंत निवेदक राजा सामंत करणार आहेत. तर संगीत साथ कौशल मेस्त्री (पखवाज) आणि बाबाजी गावकर (झांज) यांची आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






