- कुडाळ : श्रीमती प्रीती तथा जयश्री बळीराम पवार (राहणार – डिगस ता. कुडाळ) यांचे काल गुरुवार दिनांक १२-१०-२०२३ सकाळीं ०७ वाजता स्वतःच्या घरी अल्पशा आजाराने दुःखतद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७१ वर्ष होते. तीच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, वहिनी, भाचे असा मोठा परिवार आहे. तीचे दोन मुलगे नोकरीनिमित्त मुंबई येथे तर एक मुलगा उमेश पवार हे सिंधुदुर्ग जिल्हा कोर्ट येथे नोकरीस आहेत. संपूर्ण गावात त्या ‘बाई’ नावाने सुपरिचित होत्या तर माहेरी ‘बाय’ ह्या नावाने परिचित होती. त्यांचे माहेर तेंडोली येथील परब कुठुंबातील असून सध्या सुख वस्तीस बिबवनणे येथे वास्तव्यास असणारे, सुप्रसिद्ध माजी पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब यांच्या त्या मोठ्या भगिनी तर परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. डॉ. राजाराम परब यांच्या त्या मोठ्या आत्या होत.
- श्रीमती प्रीती तथा जयश्री बळीराम पवार हीचे दिगस (Digas) ता. कुडाळ येथे गुरुवार दिनांक १२-१०-२०२३ सकाळीं ७-० वाजता स्वतःच्या घरी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले मृत्यू समयी तीचे वय ७१ वर्ष होते. तीच्या पश्चात तीन मुलगे व दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.दोन मुलगे नोकरी निमित्त मुंबई येथे असतात एक मुलगा उमेश पवार हे जिल्हा कोर्ट येथे नोकरी निमत्त आहेत ती संपूर्ण गावात बाई या नावाने सुपरिचित होती तर माहेरी बाय नावाने परिचित होती. तीचे माहेर तेंडोली येथील परब कुठुंबतील ,सध्या सुख वस्तीस बिबवने असणारे डॉ एम.आर.परब माजी पशुधन विकास अधिकारी यांच्या मोठ्या भगिनी तर परफेक्ट अँकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा.डॉ राजाराम परब यांच्या मोठ्या आत्या होय .तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
- जयश्री पवार यांच्या निधनाने डिगस, तेंडोली, बिबवणे आदि गावांसह पंचक्रोशीतून शोक व्यक्त केला जात आहे.





